कन्या विद्यालयामध्ये "महाश्रमदान अभियान "उत्साहात संपन्न

पिंपरी (सह्याद्री बुलेटिन -प्रवीण डोळस) : शरीर आणि मन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून स्वस्थ व निरोगी आयुष्य लाभण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रदान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त "महाश्रमदान अभियानाचे" आयोजन करण्यात आले , विद्यालयात उपस्थित विद्यार्थिनी व अध्यापक वृंदाने प्रथम प्लास्टिक मुक्त गाव आणि भारताची प्रतिज्ञा घेतली.
    यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये विद्यार्थिनींनी 'स्वच्छता असे जेथे,आरोग्य वसे तेथे' ,'कचरा करा कमी,आरोग्याची मिळे हमी','स्वच्छता पाळा,आजारपण टाळा ','स्वच्छ भारत ,सुंदर भारत,स्वस्थ भारत ' अश्या घोषणा केल्या.या प्रभातफेरी दरम्यान समाज  प्रबोधनकार शारदाताई मुंढे  यांनी या उपक्रमाचे कौतुक करून स्वच्छता पाळण्याविषयी माहिती दिली आणि पुढील (भावी) वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
         २ ऑक्टोबर -महाश्रमदान अभियाना निमित्त विद्यार्थिनींनी प्लास्टिक कचरा गोळा केला ,व ग्रामस्थांना परिसरामध्ये प्लास्टिक ,कचरा करू नये असे आव्हान केले ,या श्रमदान अभियानासाठी विद्यालयाच्या आदरणीय पर्यवेक्षिका पाटील .यु .बी यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व अध्यापकवृंद ,शिक्षकेतर ,कर्मचारीवृंद आणि ग्रामस्थ सहभागी झाले .विद्यालयाच्या आदरणीय मुख्यध्यापिका पडवळ.एस .एस  यांच्या प्रेरणेने हे अभियान संपन्न झाले .

Review